स्थानिक
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने फलटणच्या कौशल्या चांगन आदर्श माता पुरस्काराने सन्मानित
फलटण – अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध क्षेत्रातील महिलांना आदर्श माता पुरस्कार व अहिल्या रत्न पुरस्कार देण्यात आला यामध्ये फलटण येथील प्रसिद्ध फोटोग्राफर दिवंगत विठ्ठलराव चांगण यांच्या पत्नी श्रीमती कौशल्या चांगन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
