स्थानिक
शुक्रवार पेठ तालीम मंडळातर्फे वारकरी भाविकांना चटकदार मिसळ पावचे वाटप
फलटण – नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या फलटण शहरातील प्रसिद्ध शुक्रवार पेठ तालीम मंडळातर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना चटकदार मिसळ पावचे वाटप करण्यात आले.अत्यंत चविष्ट बनलेल्या मिसळचे भाविकांनी कौतुक केले.तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात मिसळ आणि थंडगार पाण्याचे वाटप केले.दरवर्षी मंडळ भाविकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.



