स्थानिक

फलटणचा स्पीड किंग राजवीर कचरे याची पुण्यातील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट येथे पुढील शिक्षणासाठी निवड

फलटण- फलटणचा स्पीड किंग म्हणून ओळखला जाणारा राजवीर धीरज कचरे याची आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी निवड झाली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फलटण मधील ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन राजवीर धीरज कचरे याची आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी निवड झाली आहे हा वेगवान धावपटू सलग तीन वर्ष कोल्हापूर ,सांगली आणि पंढरपूर या ठिकाणी झालेल्या विविध खाजगी आणि शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. अनेक स्पर्धा जिंकून त्याने फलटणचे नाव उंचावले आहे. राजवीर हा फलटण एज्युकेशन सोसायटी मधील मुधोजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी राजवीर धीरज कचरे आता इथून पुढील वाटचाल आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी होईल. राजवीर याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य शेडगे सर, रक्षक रयतेचा न्यूज आणि इव्हेंट टीम  यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button