फलटण – आज दि.२८/११/२०२५ रोजी दुपारी २ वा.फलटण येथील गजानन चौकामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगरविकासमंत्री यांची शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तोफ धडाडणार आहे.
फलटण नगरपरिषदेच्या शिवसेना पॅनेलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर व प्रभागातील शिवसेना पॅनेलच्या अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
संपुर्ण फलटण शहर व तालुक्यातील जनतेने लक्ष लागलेली फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे फलटण शहराला व तालुक्याला काय शब्द देणार व काय बोलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक डॉ सचिन सूर्यवंशी बेडके आदी उपस्थित राहणार आहेत.