फलटण – सातारा जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग व प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे गुरुवार दिनांक 4 डिसें. ते शनिवार दिनांक 6 डिसें.या कालावधीत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रोग्रेसिवच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ संध्या गायकवाड यांनी दिली.

53 वे विज्ञान प्रदर्शन प्रथमच सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण येथे भरत असून दिनांक ४ रोजी दुपारी २ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सचिन पाटील व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव मस्के, जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन डॉक्टर प्रसाद जोशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,गट विकास अधिकारी सतीश कुंभार,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर सतीश फरांदे, गट शिक्षणाधिकारी सीजी मठपती हे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ व समारोप भारत चिल्ड्रन अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर चे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य डॉक्टर जितेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्नमेंट कौन्सिल सदस्य रणजीत निंबाळकर व सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ संध्या गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार असून या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनास सर्वांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता गायकवाड यांनी केले आहे.
Back to top button
