स्थानिक

डॉ. प्रवीण आगवणे हे प्रचारापासून दूर असल्याच्या चर्चेला आले उधाण दादा करतील का यावर निदान?

फलटण – फलटण नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत चालली असताना माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे हे अद्याप प्रचार यंत्रणेत दिसेनासे झाले आहे त्यामुळे ते नाराज असल्याचा चर्चाना आले आहे. यावर माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर करतील का निदान हे पाहावे लागणार आहे.

 फलटण शहरातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ प्रवीण आगवणे हे नामांकित डॉक्टर असून विविध सामाजिक कार्यांचा त्यांनी वसा जपलेला आहे. अनेकांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात.अनेक गरजू व गरीब रुग्णांना सुद्धा त्यांनी अल्प दरात वेळप्रसंगी मोफत सेवा दिलेली आहे. शहरातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असून कायम जमिनीवर असणारा डॉक्टर अशी त्यांची प्रतिमा आहे. यापूर्वी त्यांनी एक वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारे काम केले आहे. दिशा समितीचे सदस्य म्हणून पण त्यांनी काम केले आहे.आपल्या नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगले प्रश्न मांडले होते. कोणत्याही वादात न सापडणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वी विविध निवडणुका मध्ये ते स्वतः सक्रीय असत तसेच भाजपच्या वैद्यकीय सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून पण ते काम पाहत आहेत.

 सध्या फलटण नगरपालिकेची निवडणूक रंगात आली आहे अशा परिस्थितीमध्ये डॉ. प्रवीण आगवणे हे प्रचारात दिसत नसल्याने ते नाराज आहेत की काय?अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून ते नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. भाजपच्या तिकीट वाटपाच्या समितीत ते सदस्य होते त्यामुळे आपल्यालाच हमखास तिकीट मिळेल या दृष्टीने त्यांनी निवडणुकीची तयारी पण केली होती. अनेकांशी त्यांनी संपर्क ही साधला होता. मात्र अचानक त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे ते राजकारणापासून सध्या दूर झाल्याचे दिसत आहेत. काहीजण ते नाराज असल्याचे म्हणत असले तरी त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रभाग क्रमांक 12 मध्ये डॉक्टर प्रवीण आगवणे यांचे मतदान असून त्यांचे अनेक नातेवाईक तसेच वैद्यकीय व इतर क्षेत्रातील मित्रपरिवार सुद्धा प्रभाग क्रमांक 12 मध्ये मतदार आहेत. जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा असलेले डॉक्टर प्रवीण आगवणे हे प्रचारात दिसत नसल्याने ते नाराज आहेत की काय अशा प्रतिक्रिया आम जनतेतून उमटत आहेत. मात्र नाराज असले तरी ते खासदार गटाची साथ सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काय निदान काढतात हे लवकरच समजेल.मात्र ते प्रचारात सहभागी झाल्यास प्रभाग क्र १२ मध्ये तसेच शहरात पण त्यांचा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button