फलटण -फलटण नगरपालिका निवडणुकीत ३० वर्षांनी सत्तांतर घडवीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची सत्ता काबीज केल्याने सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार व जाहीर आभार सभेचे दिनांक 25 रोजी सायंकाळी सहा वाजता गजानन चौक येथे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारांचे जाहीर आभार तसेच भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील,ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.