स्थानिक

फलटणच्या विकासासाठी आम्ही ठामपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण – शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी आणि फलटणच्या विकासासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत काळजी करू नका अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिली 

माजी नगरसेवक  श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह आपले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी फलटण-कोरोगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  दिपकराव चव्हाण , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , फलटण पंचायत समितीचे माजी सभापती  श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर  यांच्यासह शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फलटण नगरपरिषद तसेच शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभे राहणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button