फलटण – फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये अनेक जण मोठ्या संख्येने प्रवेश करत असून शहरातील मंगळवार पेठेमधील कुरेशी नगर येथील काही मुस्लिम बांधवांनी तसेच दत्तनगर मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रभाग क्रमांक तीन मधील भाग असलेल्या कुरेशी नगर भागातील बिलाल कुरेशी, सलमान कुरेशी,आक्रम कुरेशी, शहाणूर कुरेशी, सद्दाम कुरेशी,सय्यद कुरेशी, आफताब कुरेशी, शहनवाज कुरेशी आदींनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक 12 चा भाग असलेल्या दत्तनगर भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटाला धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या भागातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाल्याने याचा नगरपालिका निवडणुकीत भाजपला निश्चित फायदा होईल असा विश्वास यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.सर्वांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तेजसिंह भोसले उपस्थित होते.