स्थानिक

निवडणुका लोकशाहीचा उत्सव व्हावा…. सर्व स्थरावर सदस्यांचा शपविधी सोहळ्यांचे आयोजन व्हावे – मुंबई उच्च न्यायालयातील विधीतज्ञ ऍड. जावेद शिकलगार यांची मागणी.

मुंबई – सध्या राज्यात नगरपालिका जिल्हा परिषदा महानगरपालिका यांच्या निवडणुकीचा काळ सुरू असून लोकशाही जीवन ठेवण्यासाठी निवडून येणाऱ्या प्रत्येक सदस्याला आमदार खासदाराप्रमाणे सर्वांना संविधान, स्वातंत्रता, समता बंधुत्वासाह एकात्मतेच्या शपथा देणे गरजेचे आहे. अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. जावेद शिकलगार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व स्थानिक स्वराज संस्थां- महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांची कार्यवाही निवडणूक आयोग व शासनाच्या वतीने सर्वत्र सुरु झालेली आहे. निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे वेळोवेळी पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुकांची एक वेळ सुरवात झालेली आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागा पर्यंत सर्वत्र एक वेगळेच वातावरण तयार झाले असून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच अगदी ग्रामपंचायत सदस्य ते सहकारी संस्था प्रतिनिधी पर्यंत सर्वजण जोमाने मेहनतीला लागले आहेत. कार्यकर्तेही तितकेच उत्साहात आहेत. मात्र असाच उत्साह या लोकप्रतिनिधिकडून निवडून आल्यानंतर भविष्यात ही कायम राहील का? प्रेम, बंधुत्व, समता, समानता, व विकासास प्राधान्य देण्यात येईल कां? व निवडून येणारे हेच सर्व प्रतिनिधी आपल्या वचन नाम्यावर असेच कायम राहतील कां? कि निवडून आल्यावर केवळ लाखोंच्या गाडीची रस्त्यावर पडलेल्या खड्यातील धूळ सर्वसामान्य माणसाच्या तोंडावर उडवून त्यांच्या गाड्या भरधाव वेगाने समोरून सुसाट निगुन जातील किंवा हंडाभर पाण्याच्या शोधकरिता ग्रामीण भागातील माझ्या भगिनीची वणवण पुढे ही अशीच चालु राहील…आणी मतदार राजाची पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आश्वासनावर बोळ वण होईल.. हा प्रश्न माझ्या सारख्या सर्वसामान्य मतदाराच्या मनात सतत उभा राहतो.कारण मी याच लोक प्रतिनिधीन्ना मतदान करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता तासंतास मतदानाच्या रांगेत उभा असतो…म्हुणुन मला वाटते निवडून येणाऱ्या सर्व लोक प्रतिनिधीन्ना जबाबदारीची जाणीव करून देण्या करिता व सर्व सामान्य जनतेच्या माहिती करिता व खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या गौरवा करिता या सर्व प्रतिनिधिंचे त्या त्या स्वराज्य संस्थात शपथविधी सोहळे आयोजित करने गरजेचे आहे. सर्वांना संविधान, स्वातंत्रता, समता बंधुत्वासाह एकात्मतेच्या शपथा देणे गरजेचे आहे तसेच त्यांना त्यांचे कर्तव्य व कार्य या विषयी कायद्याची माहिती व प्रशिक्षण देण्यात यावे तरच लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होण्यास मदत होईल… व अपना सर्वांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लोकशाहीचा उत्सव वाटू लागतील व तेव्हाच 100% मतदार राजा आपले बहुमूल्य मतदान करण्याकरिता पुढे येईल व त्याला आपल्या वेळ व परिश्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल. सध्या लोकसभा तसेच विधानसभेची हिवाळी अधिवेशने सुरु आहेत निवडून गेलेल्या लोक प्रतिनिधिनी या विषयावर चर्चा केल्यास व हा निर्णय झाल्यास सामाज्यात एक अमूलग्र बदल घडून येईल. राज्य सरकारने याचा निश्चितच विचार करावा अशी मागणी जावेद शिकलगार यांनी केली 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button