स्थानिक

प्रभाग क्र २ आणि ३ मध्ये चेअरमन यांची ज्याला साथ तोच उंचावणार विजयी हात ?

फलटण{नसीर शिकलगार} – फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होत आहे. येथे प्रत्येक मताला महत्त्व असताना या प्रभागातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेले व निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावू शकणारे सुधीर अहिवळे उर्फ चेअरमन यांची भूमिका अद्याप गुलदस्तात दिसत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता चेअरमन यांची ज्याला साथ तोच उंचावणार विजयी हात असे प्रभागांमध्ये बोलले जात आहे. 

 प्रभाग क्रमांक २ अ आणि ब मध्ये तिरंगी प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये पंचरंगी व ब मध्ये दुरंगी लढत होत आहे. सर्व लढती अत्यंत चुरशीने होत आहे यामध्ये प्रत्येक मताला किंमत आहे.

 यापूर्वी माजी नगरसेविका सौ वैशाली अहिवळे यांचे पती सुधीर अहिवळे उर्फ चेअरमन यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या घरातील कोणकोण नगरसेवक पदासाठी उभे असायचे आणि निवडून पण यायचे मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे गटातर्फे त्यांच्या पत्नी सौ वैशाली आहिवळे या निवडून आल्या होत्या. बदलत्या राजकीय परिस्थितीत सुधीर अहिवळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश करताना त्यांनी स्वतःचे अस्तित्व पणाला लावले होते. त्यावेळी येणारी नगरपालिका निवडणुकीत त्यांना हमखास तिकीट मिळणार हे प्रत्येकजण गृहीत धरीत होता. त्या दृष्टीने सुधीर अहिवळे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होताच त्यांची उमेदवारी अनअपेक्षितपणे कापली गेल्याने सर्वत्र हा मोठा चर्चेचा विषय झाला. उमेदवारी न मिळाल्याने सुधीर अहिवळे यांचे समर्थक नाराज झाले. चेअरमन यांचे अस्तित्व संपविन्यासाठी त्यांना नाकारले गेल्याची भावना त्यांच्या समर्थकामध्ये निर्माण झाली स्वतः सुधीर अहिवळे यांनाही प्रचंड धक्का बसला. त्यांनी नेतृत्वाला नाराजी दर्शवून अलिप्त भूमिका स्वीकारली त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी भाजपच्या नेते मंडळींनी बरेच प्रयत्न केले मात्र अद्याप ते निवडणूक प्रचारापासून दूरच राहिलेले आहेत.प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असणारा आणि 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असणारा अशी ओळख सुधीर अहिवळे यांची आहे.फलटण शहरात त्यांना मोठा मान आहे तसेच शहरात सुद्धा त्यांचा मोठा मित्र वर्ग आहेत. सर्व जाती-धर्मांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे. उमेदवारी कापली गेल्याने सध्या शहरात जो तो चेअरमन पुढचा राजकीय डाव काय टाकणार?काय भूमिका घेणार याची चर्चा करीत आहे. याबाबतीत त्यांच्याशी संपर्क साधला असता काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

  सध्या प्रभाग क्रमांक २ आणि ३ मध्ये जो तो आपापल्या पद्धतीने प्रचारात मग्न असला तरी सुधीर अहिवळे हे शेवटच्या दोन ते तीन दिवसात काय भूमिका घेतात तसेच ते ज्याला साथ देतील त्यालाच विजयी हात उंचावता येणार आहे. अशी परिस्थिती आहे. सध्या तरी सुधीर अहिवळे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण फलटण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button