फलटण {नसीर शिकलगार }- फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ८ ब मध्ये तिरंगी लढत होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ची तुतारी कोणाच्या विजयाची तुतारी वाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक ८ ब हा महिलांसाठी राखीव मतदार आहे. येथे भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. प्रामुख्याने भाजप व शिवसेना यामध्ये लढत होत असताना सौं शितल धनंजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची उमेदवारी मिळवीत निवडणुकीत रंग भरला आहे. प्रभाग क्रमांक ८ ब मध्ये प्रामुख्याने मराठा,मुस्लिम,तेली,जैन,महानुभाव पंथ नाभिक समाज यांची लोकसंख्या ज्यादा आहे.भाजपने अ आणि ब मध्ये अल्पसंख्याक उमेदवार दिले आहे तर शिवसेने तेली व मराठा समाज असे कॉम्बिनेशन दिले आहे. त्यामुळे या प्रभागातील मराठा समाज कोणाला साथ देणार यावरच मतदारसंघाच्या विजयाचे गणित असणार आहे. मराठा समाजाला भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांची मते भाजपला तसेच नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार समशेर सिंह नाईक निंबाळकर यांना प्रामुख्याने किती प्रमाणात २ मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
सौ शितल निंबाळकर यांचे पती धनंजय निंबाळकर हे शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते असून प्रत्येक समाजात ते मिळून मिसळून असतात घरची परिस्थिती बेताची असली तरी नेहमी प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा हातभार असतो.
त्यांनी पत्नी सौ शितल निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली असून घरोघरी त्यांचा प्रचार सुरू आहे. मतदारांकडून प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप शिवसेनाच्या उमेदवारांमध्ये विजयाचे अंतर कमी राहणार आहे. तीनही पक्षाच्या उमेदवारांनी सध्या प्रचाराचा जोर वाढविला आहे. निंबाळकर यांची उमेदवारी भाजपच्या की शिवसेनेच्या पथ्यावर पडणार हे मतदार पेटीतूनच समजणार आहे.