फलटण -फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ८ मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी झंझावाती दौरा करून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व प्रभागातील सौ सुवर्णा खानविलकर आणि विशाल तेली यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक ८ मधील शिवसेनेचे उमेदवार सौं सुवर्णा खानविलकर आणि विशाल तेली यांच्या प्रचारार्थ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गेल्या 30 वर्षाच्या काळात झालेली विकास कामे याचा आढावा घेत त्यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रत्येक मतदाराला पक्षाचा जाहीरनामा देण्यात आला तसेच मतदान कसे करायचे याविषयी माहिती देण्यात आली. या दौऱ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.