फलटण – फलटण नगरपालिका निवडणूकीत जनता आम्हाला मोठ्या बहुमताने मतदान करणार असून प्रभाग क्रमांक 12 मधील दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 12 मधील जैन मंदिर परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर भाजपचे उमेदवार अरुण खरात आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही फिरत असताना मतदारांकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.अरुण खरात यांनी यापूर्वी या भागामध्ये चांगले काम केलेले आहे. त्यामुळे लोकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सक्षम उमेदवार दिल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा आशावाद रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये घरोघरी आम्ही फिरून प्रचार केलेला आहे. मतदार आमचे उत्साही वातावरणात स्वागत करीत आहे मतदारसंघातील मतदारांचा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे. दररोज अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने प्रभाग क्रमांक 12 मध्ये उत्सान्की मतदानआम्हाला भेटेल अशी अपेक्षा अरुण खरात यांनी व्यक्त केली.