फलटण- फलटण मधील आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेले परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस रविवार दिनांक ७ रोजी विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे.

परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस दिनांक 7 डिसेंबर रोजी भक्तजनातर्फे साजरा करण्यात येणार असून त्या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत काका आपल्या कोळकी येथील महादेव मळा भागातील शुभराज या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार असून दुपारी १ वाजता आरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला असून वाढदिवसानिमित्त कोणीही हार, बुके न आणता गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी वह्या व शैक्षणिक साहित्य आणावे असे आवाहन त्यांच्या भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
