स्थानिक

राजे गटाला मोठा धक्का, जाधववाडी चे माजी सरपंच मनोज जाधव, उपसरपंच, सदस्यांचा भाजप मध्ये प्रवेश

फलटण – जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव त्यांच्यासह उपसरपंच राहुल शिंदे व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

     नगरपालिका निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याअगोदरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे. 

        आज जाधववाडी चे माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्ते यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी तालुक्यात चालू केलेल्या विकास कामांचा धडाका पाहून व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. 

       या प्रवेशामध्ये जाधववडी येथील गोविंद घनवट, मंगलताई, स्वाती जाधव,रेखाताई नाळे, सचिन गिरमे, सतीश टेंबरे, तानाजी धोतरे , मदन जाधव, चंद्रकांत शिंदे, दशरथ कोलवडकर, हेमंत कोळवडकर , राजेंद्र गिरमे, स्वप्नील शिंदे,गणेश शिंदे, प्रवीण धोतरे, महादेव धोतरे, शशिकांत जाधव, सोमनाथ घनवट, तेजस शिंदे या सर्वांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button