फलटण- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण शहर अध्यक्षपदी अमीरभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे.
सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयात आमिरभाई शेख यांना शहराध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस राजकुमार पाटील , सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, फलटण तालुका अध्यक्ष धर्मराज पाटील, सातारा जिल्हा समन्वयक नरेश देसाई हे उपस्थित होते.
अमीरभाई शेख हे फलटण तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांचे वेगळी ताकद आहे. खाजगी सावकरांचे विरोधात त्यांनी मोठा लढा उभारून अनेकांना न्याय मिळवून दिला होता. कोरोना काळामध्ये त्यांनी अनेकांना मदत केली होती तसेच शासनाच्या विविध योजना त्यांनी प्रभावीपणे राबवलेल्या आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये विविध पदावर काम केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमिरभाईशेख यांचे पक्षाचे प्रमुख खासदार शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे खासदार सौ सुप्रिया सुळे ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार,आमदार उत्तम जानकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम, नंदकुमार मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.