स्थानिक

रोबोटिक स्वागताने रंगला विज्ञान महोत्सव! डिजिटल पद्धतीने ५३व्या विज्ञान प्रदर्शनाचे प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल मध्ये भव्य उद्घाटन

फलटण -फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटने पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला आगळे वेगळे रूप दिले.

कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल पद्धतीने झालेले हे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकतेचे द्योतक ठरले.

या वेळी कार्यक्रमास आमदार सचिन कांबळे पाटील, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. सतिश फरांदे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य रणजित निंबाळकर, माजी प्राचार्य रविंद्र येवले, सरस्वती शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक श्री पांडुरंग पवार, जगदिश कदम, कोळकी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, गटसमन्वयीका दमयंती कुंभार, व्यवस्थापकीय संचालिका सौं संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड तसेच शिक्षण विस्ताराधिकारी , केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांनी केले. तसेच व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड , रणजित निंबाळकर व  सतीश फरांदे यांनी सर्व बालवैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलताना माजी प्राचार्य रविंद्र येवले म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. विज्ञान हे फक्त शिकायचे नसते, तर ते प्रत्यक्ष जीवनात अनुभवायचे असते.”

आमदार सचिन कांबळे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतीत नवनवीन वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करत असतो. विज्ञानाची हीच प्रगती शेतीला आणि देशाला पुढे नेणारी आहे.”

यावेळी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित नाटिकेचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांनी प्रदर्शनातील विविध मॉडेल्सची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.

 प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे चांगले आणि नीट नेटके आयोजन केल्याबद्दल आमदार सचिन पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button