फलटण {नसीर शिकलगार }- फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एका प्रभागातून इच्छा नसतानाही उभ्या राहिलेल्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर मतदार बघूनच वारंवार नकार घंटा उभी राहत असून समोर मतदार आल्यावर आर्थिक सहकार्य करा अशी विनवणी तोच करत आहे. या उमेदवाराच्या विचित्र आणि विक्षिप्त वागण्यामुळे त्याच्या सोबतीच्या दुसऱ्या उमेदवाराचे व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी एका उमेदवाराला प्रमुख पक्षाने उमेदवारी दिली आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत अल्पशा एवढ्या मताने त्याचे घरातील सदस्य निवडून आली होती. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अनेकांनी साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता त्यांच्या विजयात हातभार लावला होता. मात्र विजयानंतर सत्ताधारी व विरोधकांच्या मध्ये सँडविच झाल्याने त्यांना विकास कामे करता आली नाही.त्यांच्याकडे कामे घेऊन गेल्यास आमचे काही चालत नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून सतत येत होते. आम्ही पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत पडणार नसल्याचे ते बोलत होते.सज्जन आणि सुसंस्कृत असल्याने त्यांना जनता पण समजून घेत होती मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षाने स्वतः त्यांना उमेदवारी दिली आहे. आपण इच्छुक नसताना सुद्धा पक्षाने आपल्याला उमेदवार दिल्याचे ते अनेकांना खाजगीत सांगत आहेत.ऐन प्रचाराच्या अंतिम टप्प्यात फलटण नगरपालिका निवडणुका अचानक पुढे ढकल्या गेल्यामुळे सर्वांचाच खर्च वाढत चाललेला आहे. पुन्हा खर्च करावा लागत असल्याने अनेक उमेदवार हतबल झाल्याचे दिसत आहे. काही उमेदवारांचा तोल सुटत चालला आहे त्यातलाच हा एक नमुना असल्याचे दिसून येते आहे.
आता प्रचाराला सहा ते सात दिवस राहिले असताना सर्वच उमेदवारांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र मतदारांशी हसत खेळत बोलण्यापेक्षा त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर नेहमी बारा वाजल्याचे चिन्ह दिसत आहे समोरच्या उमेदवाराचे आव्हान मोठे असल्याने बहुतेक हा उमेदवार त्याच्या प्रचाराच्या जोरदार बाणामुळे घायाळ झाल्याचे दिसत आहे. एखादा मतदार पुढे आल्यास मलाच तुम्ही मदत करा असे म्हणून त्यांच्याकडेच हा उमेदवार आर्थिक सहकार्य मागत आहे.
दुसरीकडे त्या पक्षाचे प्रमुख दिवस-रात्र आपले सर्व नगरसेवक निवडून यावे म्हणून मोठे कष्ट घेत आहेत. फलटणला बदलायचे स्वप्न बघत आहे ते प्रचंड मेहनत घेत असताना या उमेदवाराच्या विचित्र वागण्यामुळे त्या प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराची तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे भवितव्य धोक्यात आले आहे. अगोदरच हा प्रभाग धोक्यात असताना उमेदवाराच्या विचित्र वागण्यामुळे आणखी धोक्यात आला आहे. या भागातील कार्यकर्ते सुद्धा त्याच्या विचित्र वागण्याला कंटाळून गेले आहेत. अचानक तो काय बोलणं हे समजत नसल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. त्या उमेदवाराच्या आणखी अनेक करामती लवकरच उघड करणार आहोत.
{क्रमश:}