स्थानिक

भाजपचे नगरसेवक संदीप चोरमले यांनी ऑन दी स्पॉट नागरी समस्या सोडविन्यावर दिला भर

फलटण – प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक संदीप चोरमले यांनी दररोज प्रभागातील समस्या सोडविण्यावर भर दिला असून विविध ठिकाणी भेटी देऊन ते नागरिकांच्या समस्या जागच्या जागी सोडवित आहेत.

 प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध ठिकाणी रस्ते उखडले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे विविध भागात कचऱ्यांची प्रचंड समस्या आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी खुदाई केल्याने तसेच खड्डे राहिलेले आहेत पिण्याच्या पाण्याची पण समस्या गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून येताच संदीप चोरमले यांनी प्रत्येक ठिकाणी जात ज्या त्या भागातील समस्या जागच्याजागी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांच्या अडचणी कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन ते सोडवित आहेत. स्वतः कामाच्या ठिकाणी ते कामे पूर्ण होईपर्यंत स्वतः उभे राहत असल्याने नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा वेगाने कामे उरकत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button