फलटण – फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण आगवणे यांनी स्थापन केलेल्या तुलसी एक्सीडेंट आणि जनरल हॉस्पिटलचा आज 28 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

डॉक्टर प्रवीण आगवणे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे याच भावनेतून त्यांनी चांगली वैद्यकीय सेवा दिलेली आहे त्यामुळे ते आज फलटण मधील एक लोकप्रिय डॉक्टर म्हणून ओळखले जातात 28 वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचे तुळशी एक्सीडेंट व जनरल हॉस्पिटल स्थापन करून त्या माध्यमातून हजारो रुग्णांना चांगली सेवा दिली आहे.

यावेळी अधिक माहिती देताना डॉक्टर प्रवीण आगवणे म्हणाले की 7 जानेवारी 2026 आमच्या ” तुलसी अक्सिडेंट आणि जनरल हॉस्पिटल” चा सत्ताविसावा वर्धापनदिन व 28 व्या वर्षात पदार्पण होत आहे.आई वडिलांचे आशिर्वाद,आदरणीय लोकनेते कै.हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे आशिर्वाद, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ.ऍड.जिजामाला नाईक निंबाळकर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, समशेरसिंह नाईक निंबाळकर ,आ.सचिनदादा पाटील यांच्या सहकार्याने आमची रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा या तत्वावर काम करीत राहिलो आहोत. यापुढेही सातत्याने याच तत्त्वावर काम करणारा असून या कामात पत्नी डॉ. सौ दीपा आगवणे यांची मोलाची साथ मिळत आहे.
डॉक्टर प्रवीण आगवणे यांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे
💥 *Achevivements*💥
▪️27 डिसेंबर 2016 … *फलटण नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती*
▪️12ऑगस्ट 2017…. *Global Economic and Research Association, Tirumalai, Tamilnadu यांच्याकडून “भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड “* ने सन्मानित
▪️25 नोव्हेंबर 2019 *Clean and Spotless Track Record in Professional Carrier* म्हणून *Star Award of Excellence for the year 2019 /2020 Apex Insurance Consultant Service , Delhi* कडून सन्मानित
▪️16 डिसेंबर 2019 *India International Friendship Society,New Delhi* यांच्याकडून *राष्ट्रीय गौरव अवॉर्ड* ने सन्मानित
▪️12 नोव्हेंबर 2020…. *भाजप डॉक्टर सेल फलटण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती*
▪️9 मार्च 2021…..*केंद्र शासन पुरस्कृत योजना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण ( दिशा ) समिती* सदस्य पदी नेमणूक
▪️*25/2/25…..*सदस्य रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय फलटण* पदी आमदार सचिन पाटील निर्देशित नियुक्ती केली आहे.
पुढील काळात पण आपल्या सर्वांचे सहकार्य व आशिर्वाद असेच राहु द्यात असे आवाहन डॉ. सौ.दिपा आगवणे,डॉ.प्रविण आगवणे,डॉ.प्रज्ञा आगवणे,डॉ.हर्षवर्धन आगवणे,तुलसी हॉस्पिटल स्टाफ यांनी केले आहे.
Back to top button
