फलटण – फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर घडवीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणल्याबद्दल भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा तसेच नवनिर्वाचित भाजप राष्ट्रवादीचे सदस्यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.