स्थानिक
फलटणमध्ये लवकरच महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा तसेच सुरक्षिततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर
दोन महिन्यात स्वच्छ शौचालये मध्यवर्ती ठिकाणी उभारणार

फलटण – येत्या काही दिवसात महिला व मुलींसाठी फलटण शहरांमध्ये मोफत बस सेवा तसेच ठिकठिकाणी शौचालये उभे करण्याबरोबरच शहरातील चौका चौकामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवि१णार असल्याचे फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रक्षक रयतेचा न्यूज व इव्हेंट टीमच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्वांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे, विद्यमान नगरसेवक सचिन अहिवळे उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षेचे बद्दल बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे बोकाळली असून ती अतिक्रमे काढून चौक मोठे केले जाणार आहेत तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून महिलांसाठी शौचालय नसल्याच्या मुद्दा उपस्थित झाला असता त्यांनी येत्या दोन ते तीन महिन्यातच शहरातील प्रमुख ठिकाणी महिलांसाठी शौचालय उभारण्यात येणार असून ती स्वच्छ व अत्याधुनिक पद्धतीचे असणार आहेत. त्याचबरोबर यापूर्वी मागील बॉडीत सद्गुरु उद्योग समूह व महाराजा उद्योग समूह यांच्या वतीने महिलां व मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याबाबत ठराव देण्यात आला होता मात्र त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी तो चांगला विषय स्थगित केला होता. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नव्हते त्यामुळे त्यांनी नेहमी चांगल्या कामांना विरोध केला. मात्र आता आम्ही महाराजा उद्योग समूह व सद्गुरू उद्योग समूह यांच्याबरोबर चर्चा करून महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी शहरात मोफत बस सेवा सुरू करणार आहोत असे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.




