फलटण – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक पाच रोजी कोळकी येथील शासकीय विश्रामगृहावर आ. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक ५/१/२०२६ रोजी दुपारी१ वाजता कोळकी (फलटण )येथील इरिकेशन रेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आमदार सचिन कांबळे पाटील, राष्टवादी तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रामभाऊ ढेकळे , ज्येष्ठ नेते .डी. के. पवार, महिला तालुका अध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिंदे, ज्येष्ठ नेते अशोकराव सस्ते, ज्येष्ठ नेते भीमराव बुरुंगले. राष्ट्रवादी पुरस्कृत जेष्ठ नेते व नगरसेवक सोमाशेठ जाधव, राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविका सौ.अस्मिता लोंढे तसेच नगरसेवक व शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका सौ.मीनाताई काकडे, नगरसेविका सौ.सुपर्णाताई अहिवळे, विक्रमसिंह भोसले,सातारा जिल्हा उपाध्यक्ष विकास राऊत, युवक संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.