स्थानिक

जि.प आणि पंचायत समिती निवडणुका शिवसेनातर्फे स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजीवराजे यांच्यात गुफ्तगू

फलटण : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री शिवसेना पक्षप्रमुख ना.एकनाथराव शिंदे यांनी आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढविण्याचे आदेश स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत, तसेच त्या दृष्टिकोनातून कामाला लागावे असेही त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सांगितले आहे.

 सातारा येथे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई ,मंत्री ना.भरत गोगावले  यांची आज सैनिक स्कूल ग्राउंड, सातारा येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका संदर्भात चर्चा करुन ताकदीने लढविण्याचा दृढनिश्चय केला, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अँड.संदीप कांबळे व जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button