फलटण – के . बी . बायो ऑर्गेनिक्सकडून ‘ मायकोरिस ‘ चे लोकार्पण : ROC ( Root Organ Culture ) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मायकोरायझाचे बाजारात आगमन झाले आहे.

२०२६ भारतीय शेतीला शाश्वत , पर्यावरणपूरक आणि विज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत के . बी . बायो ऑर्गेनिक्स प्रा . लि . यांनी आपले नवे उत्पादन ‘ मायकोरिस ‘ ( Mycorrhiza Bio- Fertilizer ) बाजारात सादर केले आहे . ROC ( Root Organ Culture ) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे उत्पादन पिकांच्या मुळांच्या आरोग्यासोबतच एकूण उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे . के . बी . बायो ऑर्गेनिक्स ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना विश्वासार्ह , सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शेती उपाय पुरवत आहे . त्याच परंपरेतून ‘ मायकोरिस ‘ हे उत्पादन कंपनीच्या अत्याधुनिक हाय – टेक प्रयोगशाळेत अनुभवी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले आहे . या अंतर्गत ‘ मायकोरिस प्रीमियम ‘ आणि ‘ मायकोरिस ‘ अशा दोन वेगवेगळ्या श्रेणीतील उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत . शेतकऱ्यांच्या गरजा , पिकांची अवस्था व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडता यावा , या उद्देशाने या दोन्ही श्रेणी विकसित करण्यात आल्या असून त्या उच्च दर्जाच्या मायकोरायझा तंत्रज्ञानावर आधारित आहेत . कंपनीचे मायकोरायझा उत्पादन युनिट हे पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे . या युनिटची दररोज ७,००० बॉटल्स उत्पादन क्षमता आहे . देशातील मोजक्याच कंपन्यांकडे अशी प्रगत सुविधा उपलब्ध असून , के . बी . बायो ऑर्गेनिक्स ही त्यातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते . ‘ मायकोरिस ‘ हे पिकांसाठी तिहेरी कार्यपद्धतीचे ( Triple Action ) फायदे देणारे प्रभावी उत्पादन आहे . यामध्ये मुळांची मजबूत व खोल वाढ होणे , जमिनीतून पोषकद्रव्यांचे अधिक व कार्यक्षम शोषण तसेच पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि ताण सहनशीलता वाढवणे , या प्रमुख बाबींचा समावेश आहे .
या उत्पादनाच्या लोकार्पणप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांनी सांगितले की , मायकोरिसचे लोकार्पण हे २०२६ च्या सुरुवातीलाच नवकल्पना , संशोधन आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे . शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम , टिकाऊ आणि निसर्गस्नेही शेतीकडे घेऊन जाणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे . ‘ यावेळी त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की , हे उत्पादन लवकरच भारतातील १३ राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे . या कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकारी , संशोधक तसेच विविध विभागांतील सर्व टीम सदस्य उपस्थित होते . ‘ मायकोरिस ‘ हे उत्पादन रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल राखण्यास मदत करणारे असून , सध्या विविध पिकांसाठी बाजारात उपलब्ध आहे . या उत्पादनामुळे भारतीय शेतीला आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा भक्कम आधार मिळणार असून , शाश्वत व हरित शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जाणार आहे .
Back to top button
