फलटण – के बी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि रक्षक रयतेचा न्यूज& इव्हेंट टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गगनगिरी ज्वेलर्स यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन महाराजा मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
या हळदीकुंकू समारंभासाठी येणाऱ्या प्रथम एक हजार महिलांना के.बी. आणि गॅलेक्सी उद्योग समूहातर्फे आकर्षक वाण आणि नाश्ता दिला जाणार आहे. तसेच यावेळी उपस्थित महिलांना लकी ड्रॉ मध्ये सुद्धा भाग घेता येणार आहे. लकी ड्रॉ साठी हजारो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये नेकलेस,मोत्यांचा हार,पैठणी तसेच इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
या भव्य हळदी कुंकू समारंभासाठी फलटण शहर व परिसरातील सर्व महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.