फलटण -एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट स्कूल ऑफ फार्मसी बारामती आयोजित राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी पार पडली. सदर स्पर्धेत फलटण येथील सौ वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज फलटण महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी कुमारी सिद्धी अडसूळ आणि कुमार तनमन बर्डे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला व या विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रुपये तीन हजार रुपये मिळाले .
या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ आत्माराम पवार प्रिन्सिपल ऑफ पुणे कॉलेज ऑफ फार्मसी भारती विद्यापीठ पुणे यांनी डिप्लोमा फार्मसी विद्यार्थ्यांसोबत “फ्युचर रेडी फार्मासिस्ट ट्रान्सफॉर्मिंग कम्युनिटी हेल्थ फॉर नेक्स्ट डीकेड “या विषयावर परिसंवाद साधला. आजच्या या राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये सर्व डिप्लोमा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. सर्व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) , संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य .महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सौ ज्योतीवहिनी सचिन सूर्यवंशी (बेडके) व विद्यालयाचे प्राचार्य मनोज फडतरे सर या सर्वांनी अभिनंदन केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले.