फलटण – फलटण शहरात शुक्रवार पेठ येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन माजी नगरसेवक फिरोज आतार यांनी केले आहे.
फलटण शहरामध्ये शुक्रवार पेठ येथून तीन रस्ते जातात या चौकामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील,नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सिमेंट रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय होणार असून नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन फिरोज आतार यांनी केले आहे.
दरम्यान आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक फिरोज आतार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रीतम बेंद्रे बाळासाहेब सुतार, निलेश चिंचकर, वैभव जानकर, सचिन नाईक आदी उपस्थित होते.