फलटण – सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी धुरंधर आणि लोकप्रिय नेतृत्व संदीप शिंदे यांच्या उमेदवारीची ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे. सततच्या जनसंपर्काच्या जोरावर आपल्याला उमेदवारी भेटेल असा विश्वास संदीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी भाजप खासदार गटातून उमेदवारी मिळावी यासाठी पंचक्रोशीत संदीप शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गेली तब्बल ३५ वर्षे दिवंगत मा. खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात निष्ठेने काम केले आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात त्यांनी मागील जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी खचून न जाता समाजसेवेची गती त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही व लोकांच्यात असलेल्या जनसंपर्कामुळे तेवढ्याच जोशाने व तत्परतेने लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवत “दादांचा शब्द म्हणजे अंतिम आदेश” मानून काया-वाचा-मनाने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून संदीप शिंदे ओळखले जातात. पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क, तब्बल १५० पेक्षा अधिक बचतगट उभारून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे भरीव काम तसेच जवळपास 200 तरुणांना नोकरी लावण्याचे काम देखील त्यांनी केले आहे.
रणजित दादांच्या माध्यमातून शिंदेवाडी कंबळेश्वर पूल (७० लाख), खुंटे-शिंदेवाडी रस्ता (१.५ कोटी), खुंटे-पाटणेवाडी रस्ता (२ कोटी), स्मशानभूमीची भिंत तसेच दलित वस्तीतील रस्त्यांसह अनेक विकासकामे मंजूर करून घेतली आहेत.
अशा कार्यक्षम, निष्ठावान आणि तळागाळात काम करणाऱ्या नेतृत्वाला पंचायत समितीची उमेदवारी मिळावी, अशी ठाम इच्छा सस्तेवाडी गणातील जनतेतून व्यक्त होत आहे.
Back to top button
