स्थानिक

विडणी पंचायत समिती गणातून महेंद्र सूर्यवंशी बेडके यांचा काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल

फलटण – फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विडणी पंचायत समिती गण क्र.१२ मध्ये अर्ज दाखल केला आहे.

 विडणी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण गटासाठी खुला असून महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे विडणी पंचायत समिती गणातील मतदारांना त्यांनी निवडणूक लढण्या मागची भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की हा अर्ज केवळ कागदावरचा नाही,तर तो तुमच्या विश्वासाचा, आशेचा आणि हक्काच्या लढ्याचा अर्ज आहे.लहानपणापासून या मातीशी नातं जोडलं आहे.गावच्या रस्त्यांवर चालताना,लोकांच्या अडचणी ऐकताना,प्रश्नांवर आवाज उठवतानामी नेहमी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता राहिलो आहे.

सत्ता, पैसा किंवा घराणेशाही नाही,आहे फक्त प्रामाणिकपणा, विचारधारा आणि जनतेसाठी झगडण्याची तयारी आहे.काँग्रेसची मूल्ये – समता, न्याय, लोकशाही आणि सर्वसमावेशक विकास –हीच माझ्या राजकारणाची दिशा आहे.हा लढा माझा एकट्याचा नाही,हा लढा आहेअन्यायाविरुद्ध न्यायाचा दुर्लक्षितांच्या हक्कांचा गावाच्या सर्वांगीण विकासाचातुमचा आशीर्वाद, तुमचा विश्वास आणि तुमची साथ हेच माझं सर्वात मोठं भांडवल आहे.चला, मिळून एक नवी आशा उभी करूया असे आवाहन महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी  मतदारांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button