स्थानिक

फलटण येथे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी माळी समाज वधु-वर पालक परिचय मेळावा

फलटण : महाराष्ट्र माळी समाज महासंघ,तसेच महामित्र पाक्षिक परिवार याच्या वतीने रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत संत सावता महाराज मंदिर , फलटण, जि.सातारा येथे राज्यव्यापी माळी समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आला असल्याचे संयोजक दशरथ फुले यांनी सांगितले.

 गेल्या ३४ वर्षापासुन महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने फलटण येथे माळी समाज वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते 

गेल्या ३४ वर्षात फलटण येथे होणार्‍या मेळाव्याचा लाभ राज्यातील अनेक वधु-वरांनी व त्याच्या पालकांनी घेतला असुन या मेळाव्याच्या माध्यमातुन पाच हजाराहुन अधिक विवाह जुळून आले आहेत,या माध्यमातून पालक वर्गाचा मोठ्या प्रमाणात आपआपसात परिचय वाढला आहे. तसेच या वधु-वर परिचय मेळाव्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सामाजिक संघटनेस गती व बळकटी मिळाली असुन आज फलटण हे राज्यातील वधु-वर मेळाव्याचे केंद्र बनले आहे.

फलटण येथील मेळाव्याची प्रेरणा घेऊन राज्यात अनेक ठिकाणी मेळावे घेतले जात आहे व त्याचा फायदा वधु-वरांना व त्याच्या पालकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी फलटण या ठिकाणी भेटी देऊन मेळाव्याचे उद्घाटन केले असुन या हि वर्षी विविध मान्यवरांना निमंत्रित करून त्याचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तरी या मेळाव्याचा लाभ माळी समाजातील प्रथम वधु-वरांनी तसेच विधवा, विधूर, घटस्फोटीत, वधु-वरांनी घ्यावा असे आवाहन संयोजकानी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button