स्थानिक

फलटण येथे पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ विषयावर इंद्रजीत देशमुख यांचे समुपदेशन सत्र

फलटण –  सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) यांच्या वतीने दि. १३ फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार) रोजी पालकांसाठी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत *‘सुजाण पालकत्व’* या विषयावर समुपदेशन व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.

या समुपदेशन सत्रात  इंद्रजित देशमुख (काकाजी), संस्थापक , शिवम प्रतिष्ठान , घारेवाडी , कराड हे पालकांना मार्गदर्शन करणार असून, बदलत्या काळातील पालकांची भूमिका, मुलांचे संगोपन, त्यांचा शैक्षणिक व मानसिक विकास या विषयांवर सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी या समुपदेशन व मार्गदर्शन सत्रास सर्व माता-पिता पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच हे मार्गदर्शन सत्र परिसरातील सर्व पालकांसाठी खुले राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. आजच्या या पिढीला घडविण्यासाठी योग्य असे अनमोल मार्गदर्शन देणारे प्रमुख वक्ते आदरणीय गुरुवर्य काकाजी ज्यांनी या देशाची युवा पिढी खूप चांगली व्हावी म्हणून अथक प्रयत्न करत असणारे , भारत बलशाली व्हावा , आपल्या देशातील तरुण ज्ञानाने प्रगल्भ ,विचारांनी कुशल व मनाने सुंदर व्हावेत यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड व प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button