फलटण – फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक गाव पिंजून काढत प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे.
फलटण तालुक्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा दुरंगी सामना होत असून प्रचाराच्या निमित्ताने नेतेमंडळी गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक गावोगावी प्रचाराचा जोरदार धडका लावीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विरोध गटातील अनेक जण दररोज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचार करत आहेत.प्रत्येक गावागावामध्ये जाऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर सभा घेत आहेत तसेच वैयक्तिक गाठीभेटी घेत असून कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम करत आहेत.
निरा देवघर व धोम बलकवडीच्या कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचे नियोजन तसेच संपूर्ण तालुका बागायत करण्याचे मुद्देसूद भाषणे ते देताना दिसत आहेत. नियोजित नाईक बोमवाडी एमआयडीसी नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योगधंद्याविषयी व रोजगार विषयी त्यांचा प्रामुख्याने भर असून गावोगावातील रस्ते, आरोग्य, पाणी सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रचारात मुख्य ते भर देत आहे. त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये तसेच इतर शासनाच्या काळात त्यांनी तसेच आमदार सचिन पाटील यांनी केलेल्या विकास कामावर ते मते मागताना दिसत आहेत. फलटण नगरपालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची सत्ता आणलीच पण पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.