फलटण – आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज असे परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांच्या कोळकी येथील महादेव मळा भागातील शुभराज या निवासस्थानी महाशिवरात्रीनिमित्त रविवार दिनांक 15 रोजी सकाळी 9 वाजता विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त परमपूज्य राजनकाका यांचे धार्मिक विषयावर प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ,शिवाजी रोड,बुधवार पेठ फलटण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.