फलटण – आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून फलटण तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस न जयकुमार शिंदे यांनी दिली ..
कोळकी जिल्हा परिषद गटातील व वाड्यावस्ती वर लाईट ची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार सचिन पाटील, मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, अँड जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सौर दिवे मजुर करणयात आले आहेत . यामुळे लोकाची सोय होणार आहे. तसेच डोंगरी विकास योजनेतुन दालवडी या ठिकाणी बंदिस्त गटर योजनेतून ५ लाख रुपये मंजुर तसेच भाडळी खु येथे बंदिस्त गटर योजनेतून २.५० लाख मंजूर करण्यात आले आहे.
आमदार फंडातून गोळेगाव ठाकुरकी ,झिरपवाडी येथे रस्तासाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजुर करण्यात आले तसेच गिरवी,जाधववाडा येथे ७ लाखांचा सभामंडप मंजुर करण्यात आले आहे.. सौर दिवे हे पुढील. प्रमाणे मंजुर कोळकी २नग, गिरवी ३ , धुमाळवाडी २, बोडकेवाडी२, भाडळी खुर्द २, भाडळी बु, २, सोनवडीबु, २कुरवली २ , जाधववाडी २, झिरपवाडी , २,ठाकुरकी२, चावडी २, दालवडी, २, निरगुडी, २, मांडवखडक २, विचुरणी २, सासकल२ असे एकुण ३५ दिवे मंजुर करण्यात आले आहे अशी माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली.