स्थानिक

आ. सचिन पाटील यांच्या निधीतून वाठार निंबाळकर गणामधील सर्व गावांना सौर दिवे मंजूर- सौं शुभांगी शिंदे

फलटण – आमदार सचिन पाटील यांच्या निधीतून वाठार निंबाळकर गणामधील सर्व गावांना सौर दिवे मंजूर करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्या सौं शुभांगी तुकाराम शिंदे यांनी दिली.

 माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली वाठार निंबाळकर गणातून सौ शुभांगी तुकाराम शिंदे या भाजप तर्फे निवडून आल्या आहेत त्यांनी सौरदिवे बसविण्यासंदर्भात आमदार सचिन पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीप्रमाणे वाठार निंबाळकर गणातील सर्व गावांमध्ये सौर दिवे मंजूर झाले आहेत. यामध्ये उपळवे, खडकी, जाधवनगर {उपळवे} ढवळ, तरडफ,दऱ्याचीवाडी, फरांदवाडी, मिरेवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, वेळोशी, शेरेचीवाडी{ढवळ} सावंतवाडा {उपळवे} या गावांचा समावेश आहे. सदरचे सौरदिवे मंजूर केल्याबद्दल माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button