फलटण – फलटण शहरातील नगरपरिषद मालकीच्या इमारतीचें नामांतर करण्यात आले आहे. या निर्णयाचे भीमअनूयायांनी जोरदार फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
आज फलटण नगरपरिषद फलटण मधील झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. 9 (सभाग्रह आणि इमारतीना महापुरुष चे नाव देणे बाबत) बहुमताने मंजूर करून घेण्यात आला. यामध्ये नगरपालिकेच्या इमारतीमधील विविध सभागृहांना राष्ट्रपुरुषांची नावे देण्यात येणार आहेत.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आनंदोस्ताव साजरा करण्यासाठी भीमअनूयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष केला.
या निर्णयाबद्दल मा.खा.रणजितासिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्यासह सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानण्यात आले
यावेळी नगरसेविका सौ.सुपर्णा ताई अहिवळे, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका मीनाताई काकडे. कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, संजय निकाळजे, संजय गायकवाड, हरीश काकडे,सागरदादा सोरटे,प्रशांत काकडे,सनी मोरे,सुनील नाना अहिवळे,विकी बोके,जीवन काकडे, वैभव मोहिते,किरण अहिवळे,पिंटू संभाजी मोरे, अभिजित गायकवाड,मुकेश रणपिसे, प्रकाश मोरे इ.उपस्थित होते.