स्थानिक
फलटण येथे मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त होणार या शिबिरास मोठा प्रतिसाद

फलटण – डायबेटीस मुक्त आयुर्वेदिक जीवनशैली अभियानांतर्गत रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण व आनंदी कँसलटंसी वडूज यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ रोजी महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे 100% शुगर मुक्त होणार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये रक्ताची मोफत तपासणी करून आरोग्यदायी जीवन जगण्याविषयी मोलाचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेह रुग्णांना 100% शुगर मुक्त होण्याचा फार्मूला सांगण्यात आला आत्तापर्यंत जे शुगर मुक्त झाले आहेत त्यांचे पण अनुभव खास सांगण्यात आले.
सध्या बरेच जण शुगर{ डायबिटीस } मुळे त्रस्त आहेत शुगर मुक्त होण्यासाठी हे शिबिर महत्वाचे ठरणार असल्याचे स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या प्रमुख सौ मधुबाला भोसले यांनी सांगून दरमहा अशा पद्धतीचे शिबिर घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सर्व आजारावर सुद्धा मोफत मार्गदर्शन करण्यात आले . अनेक रुग्णांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली .

कार्यक्रमाची सुरुवात स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या प्रमुख सौ मधुबाला भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमास नीड फीड इंडिया कंपनीचे कृष्णा जाधव, लायन्स क्लब फलटणचे योगेश प्रभुणे, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे बाळासाहेब ननावरे, डॉ. बळवंत मोरे,आनंदी कन्सल्टन्सी वडूजचे संस्थापक अरुण बर्गे,अमृतराव देसाई,महारुद्र तिकुंडे, रक्षक रयतेचा न्यूजचे संपादक नसीर शिकलगार, रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटणच्या सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक सौ नंदा बोराटे यांनी केले. आभार कृष्णा जाधव यांनी मानले.
सदरच्या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण व आनंदी कन्सल्टन्सी वडूज यांचे सर्वांनी कौतुक केले.
उपस्थित लोकांमधून १० लकी ड्रॉ काढण्यात आले.


