स्थानिक

हॉटेल व्यवसाय करता गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत उपलब्ध करून द्यावा, हॉटेल असोसिएशनची मागणी

फलटण – सध्या फलटण तालुक्यात गॅसचा पुरवठा कमी होत असून यामुळे हॉटेल व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय करता गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

 फलटण तालुका हॉटेल असोसिएशन तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्य परिस्थितीत इराण अमेरिका युद्धामुळे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जीवनाश्यक वस्तूमध्ये अन्नाचा सहभाग असून अन्न शिजवण्यासाठी गॅसचा पुरवठा हॉटेल व्यवसाय करता व्यवस्थित होत नाही त्यामुळे ग्राहकांना सेवा देता येऊ शकत नाही. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि लोकांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी गॅसची उपलब्धता नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. हॉटेल मधील सेवक व त्यांचे कुटुंब हॉटेल व्यवसायावर अवलंबून असून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले आहेत गॅस नसल्यामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प असून कर्जाचा डोंगर वाढत आहे. हॉटेल व्यवसाय गॅस पुरवठा अभावी अडचणीत आल्याने त्वरित सर्व हॉटेल व्यवसायिकांना गॅसचा पुरवठा करावा अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button