स्थानिक
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रथेप्रमाणे मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त दुधाचे वाटप

फलटण – फलटण शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांना दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून रमजान ईद निमित्त दुधाचे वाटप करण्यात आले.

दरवर्षी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना मोफत दुधाचे वाटप करत असतात ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून याही वर्षी दुधाचे वाटप करण्यात आले. दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा सर्वधर्मसमभावाचा वारसा त्यांचे दोन्ही सुपुत्र नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जपला असून दिवाळीला फराळाचे तर रमजान ईदला दुधाचे वाटप करण्यात येत असते. या उपक्रमाबद्दल भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष रियाजभाई इनामदार,शहराध्यक्ष बबलू मोमीन, माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर मलटण दर्गा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेदभाई शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सिराजभाई शेख,मुस्लिम बांधवांनी धन्यवाद दिले आहेत.दरम्यान रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




