मुंबई – सातारा जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ. प्रियाताई महेश शिंदे,उपाध्यक्ष राजू भोसले यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौ.प्रियाताई शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पुढील वाटचालीला नवी ऊर्जा, नवी दिशा मिळणार असून सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली मिळाली अशी भावना, नवनिर्वाचित अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विकासकामांना या सक्षम नेतृत्वातून अधिक बळ मिळेल आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारी कार्यपद्धती अधिक गतिमान होईल, असा विश्वास आहे..
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हा मा.अध्यक्ष तथा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम, मा. जिल्हा परिषद सदस्य अरुण (आबा) गोरे, युवानेते निलेश माने,वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, सातारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, खटाव पंचायत समिती उपसभापती रेश्माताई शेडगे,खटाव पंचायत समिती सदस्य हनमंत बोटे,पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
