फलटण – फलटण मधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड चे प्रमुख डॉक्टर प्रसाद जोशी यांना या वर्षीचा ” उषा-वैभव ” पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार सोहळा ५ एप्रिल २०२६ या दिवशी संध्याकाळी सजाई गार्डन येथे होणार आहे.
डॉक्टर प्रसाद जोशी यांना प्रसिद्ध गायिका श्रीमती उषा मंगेशकरजी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी हे ही उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी उषा – वैभव पुरस्कार हा, रमेश देव , सौ. प्रतीक्षा लोणकर , मोहन आगाशे , संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग , कवी गीतकार शांताराम नांदगावकर, शिक्षण तज्ञ अविनाशी तांबे, तेजस्विनी सावंत , अभिनेत्री जुही चावला , गोविंद मिल्क चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि अशा बऱ्याच दिग्गज मंडळींना या पूर्वी दिला गेला आहे .
त्यानिमित्त अनुबंध कला मंडळ , यांनी एक ‘Magical RD night’ आयोजित केली आहे .