मुंबई – शिकलगार जमात ट्रस्ट मुंबईतर्फे शिकलगार समाजाच्या अधिवेशनानिमित्त दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9.30 वाजले पासून भव्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे. सदर वैद्यकीय शिबिर हे प्राथमिक आरोग्य केंद्र लेंगरे{ता. खानापूर जि -सांगली }यांच्या सौजन्याने आणि सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार ट्रस्ट यांच्या सहकार्यातून भरविण्यात येत आहे.
तरी समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने लेंगरे येथे उपस्थित राहून या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिकलगार जमात ट्रस्टचे अध्यक्ष नौशादभाई शिकलगार यांनी केले आहे.