स्थानिक

माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती यांचा भाजपा मध्ये प्रवेश

फलटण – प्रभाग क्रमांक 12 मध्ये राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देत माजी उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुनील मठपती यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले  नगरसेवकपदाच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने त्यांची ओळख विकासाभिमुख नेतृत्व म्हणून झाली होती. प्रचाराच्या धामधुमीत त्यांनी राजे गटाला धक्का देत थेट खासदार गटाच्या पाठिशी उभे राहत भाजपात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले.

प्रवेशावेळी मठपती यांनी प्रभागातील जनता आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला प्रभाग 12 मध्ये मोठी ताकद प्राप्त झाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button