स्थानिक

सोबतीच्या दुसऱ्या उमेदवारावर भरोसा नसल्याने अनेकजण मागतात स्वतःपुरते एक मत, क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात होणार,मतदारांमध्ये रंगल्या खुमासदार चर्चा

फलटण – फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रचाराला उमेदवारांनी जोरदार सुरुवात केली असली तरी काही उमेदवार स्वतःच्या प्रभागातील दुसऱ्या उमेदवार वर विश्वास नसल्याने स्वतः पुरते एक मत मागत असल्यामुळे पॅनल टू पॅनल मतदान होणे अवघड होणार आहे. याचा अनेक उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

 फलटण नगरपालिका निवडणुकीचा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निवडणूक स्थगित झाल्याने पुन्हा एकदा अर्ज भरलेल्या उमेदवारांना प्रचाराची सुरुवात नव्याने करावी लागली आहे. एकंदरीत निवडणुकीचा आढावा घेताना अनेक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसले. त्यामध्ये अनेक उमेदवारांना त्याच प्रभागातील त्यांच्या सोबतीचा राहिलेल्या उमेदवाराबद्दल विश्वास नसल्याने अनेकजण स्वतःच्या उमेदवारीचा विचार करताना मतदारांकडे आता एक मत मागू लागले आहेत. आपल्याला निवडून यायचेच आहे हीच भूमिका काही उमेदवारांनी ठेवल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग चा फटका अनेकांना बसणार आहे. मतमोजणीच्या वेळेस कसे क्रॉस वोटिंग झाले हे उघड होणार असले तरी याची परवा न करता उमेदवार स्वतः निवडून येण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहे.

फलटण नगरपालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असल्याने एका प्रभागा मध्ये दोन दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मतदान करायचे आहे.त्यामुळे एका मतदाराला प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये ३ मते देता येणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये ४ मते देता येणार आहेत. एकंदरीत सरासरी विचार करता मतदारांना आता उमेदवार भेटताना नेतेमंडळीसमोर संपूर्ण पॅनलला मतदान करण्याचे आवाहन करत आहे मात्र खाजगी बैठकीत मला एक तरी मत द्या असे आवाहन करताना दिसत आहे. उमेदवार स्वतः निवडून येण्याचा विचार करत असल्याने व स्वतःपुरते मत मागत असल्याने याच्यात चांगल्याच खमंग चर्चा मतदारामध्ये रंगल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button