फलटण{ नसीर शिकलगार} – फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रमुख पक्षांच्या विरोधात तीन अपक्षांनी अर्ज दाखल करून निवडणुकीत जबरदस्त चुरस निर्माण केल्याने संपूर्ण शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक 9 कडे लागले आहे. अपक्ष उमेदवार कोणाचा गेम करणार याबाबतच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. अपक्षांना हलक्यात घेणाऱ्याला मात्र घरी बसावे लागणार आहे.
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 9 हा महिला ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक ९ हा सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहणारा व आकाराने मोठा असा प्रभाग आहे. फलटण शहरातील क्रांतिवीर उमाजी नाईक चौक,मेटकरी गल्ली,मच्छी मार्केट,रविवार पेठेचा काही भाग, सिमेंट रोड,पवार गल्ली या प्रभागात येत आहेत. मराठा, मुस्लिम, रामोशी समाजाचे प्राबल्य या प्रभागात आहे.
दोन्ही नाईक निंबाळकर गटाकडून प्रमुख उमेदवार उभे असले तरी अपक्षांची चर्चा ज्यादा आहे. या प्रभागांमध्ये ९ अ मधून सौ मंगल अतुल मोहोळकर यांनी तर 9 ब मधून सचिन गानबोटे, सुरज कदम पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले आहे. या अपक्षांचा विचार करता त्यांची नाळ जनसामान्यांशी जोडली गेलेली आहे. सर्व सामान्य कुटुंबातील सर्वजण असल्याने व प्रत्येकाच्या मदतीला नेहमी धावून येत असल्याने प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक जण त्यांना व्यक्तीशा ओळखत आहेत व अनेकांचे त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत.
याचाच फायदा या तीनही अपक्ष उमेदवारांना होण्याची शक्यता असून त्यांनी जर जास्तीत जास्त मते खेचली तर प्रमुख उमेदवारांना मत विभागणीचा जोरदार फटका बसून घरी बसावे लागणार आहे.
९ अ मधून उभ्या राहिलेल्या सौ मंगल मोहोळकर या नवदीप मंडळाचे अध्यक्ष अतुल मोहोळकर यांच्या पत्नी असून अतुल मोहोळकर यांचा संपूर्ण फलटण शहरात चांगला जनसंपर्क आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील असून सुद्धा श्रीमंत मनाचा माणूस म्हणून अतुल मोहोळकर यांना ओळखले जाते. प्रत्येकाच्या ते मदतीला पुढे असतात गोड बोलणे यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे प्रभाग क्रमांक 9 ब मधील सचिन गानबोटे हे व्यापारी असून त्यांच्या मनमोकळ्यामानामुळे घराघरात त्यांची ओळख आहे. अडचणीचे काळात त्यांनी अनेकांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याने याची जाणीव अनेकांना आहे त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. सुरज कदम हे सामाजिक कार्यात आघाडीवर असून रविवार पेठ तालीम मंडळ परिसरात त्यांचा विविध कार्यक्रमात सहभाग असतो अनेक युवक त्यांच्यासोबत नेहमी असतात त्यामुळे त्यांनाही ओळखणारा मोठा मतदार आहे. नेहमी तिघेही उपलब्ध होणार असल्याने मतदारांमध्ये त्यांची चांगली चर्चा आहे.
तीनही अपक्ष हलक्यात घेण्यासारखे नाहीत. अपक्ष असल्याने त्यांच्यावर प्रचाराची मर्यादा येत असली तरी जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याने याचा किती फायदा त्यांना होतो हे प्रत्यक्ष निवडूनुकी नंतरच समजणार आहे. तिघांनीही मतदारसंघ पिंजून काढला असून वैयक्तिक गाठी भेटीवर ते जोर देत आहेत. स्वतः पुरते एक मत मागत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होणार आहे क्रॉस वोटिंग चा फटका कोणाला बसेल हे तुर्त सांगता येत नसले तरी दोन्ही पक्षातील उमेदवारांना अपक्षांची चिंता करावीच लागणार आहे.