Uncategorized

मानसाच्या जिवनात आनंद आहेच त्या बरोबर ज्ञानाची आवशक्ता आहे – ह. भ. प.बंडातात्या कराडकर

तरडगाव:(संजय किकले) -मानसाच्या जिवनात आनंद आहेच त्या बरोबर ज्ञानाची अवशक्ता आहे असे मत युवक मित्र ह. भ. प.बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले.

 तडवळे ता.फलटण येथील चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह ७५० ज्ञानेश्वरी वाचकांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.या सप्ताहात जेष्ठ किर्तनकर हभप संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या प्रखर वानीतुन भावना व्यक्त केल्या.

न करी रे संग राहे रे निश्चळ॥१॥

अंतरी या थारा आनंदाचा॥४॥

या तुकाराम महा.४ चरणाच्या अभंगावर विवेचन करताना आपल्या जीवनात बाह्य क्लेशाने आत्म्यास दुखः होत असते.आपन जे बोलायचे नाही ते बोलतो ते न बोलता कृतीत उतरून अनुभव घ्यावा. मानसाला जीवनात ज्ञानाची अवशक्ता आहे पण ते ज्ञान पोपट पंची नसावे या साठी प्रापंचिक व अध्यात्मिक उदाहरणे देऊन पटवून दिले.ज्ञान वाच्यात्मक नसता ते क्रियात्मक पाहीजेत.कार्य करताना अंतकरण चंचल नसावे ममतेचा मळ लागला की अंतकरण चंचल होते. इंद्रियावर जय मिळवण्यासाठी वासना संपवा. 

आपल्या जिवनातआनंद नाही असे नाही पण अंतररंग असावा तो शास्त्राने सुशुक्तीला आनंदकोश मानलाआहे. वेदांतात ७ अवस्था आहेत अज्ञान,अवरण, विक्षेप,पदोक्षज्ञान,अपरोक्षज्ञान,शोक ज्ञान,आनंद वापसी याचे संपूर्ण विस्लेशन केले अवघा आनंद आत्म्याच्या संयोगा मध्येआहे.असे व्यसनमुक्ती प्रवक्ते युवकमीत्र बंडातात्या कऱ्हाडकर यांनी किर्तनातुन सांगीतले.

हजारोंच्या संखेने श्रोते उपस्थीत होते.सप्ताहाचेआयोजन समस्त ग्रामस्थ मंडळ तडवळे आणि श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ तडवळे विवीध मंडळे या सर्वांच्या संयोजनातून करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button