स्थानिक

प. पु. राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

फलटण- फलटण मधील आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेले परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस रविवार दिनांक ७ रोजी विविध उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचा वाढदिवस दिनांक 7 डिसेंबर रोजी भक्तजनातर्फे साजरा करण्यात आला. सकाळी १० ते १ या वेळेत काका यांनी कोळकी येथील महादेव मळा भागातील शुभराज या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सकाळी त्यांच्या पत्नी सौं कल्पना देशमुख, सून सौं मेघा देशमुख यांनी केले. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना प्रत्यक्ष आणि फोन द्वारे विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर,माजी नगरसेविका सौं सुवर्णा खानविलकर, प. पु.नवनाथमहाराज शेलार, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख,राजाभाऊ देशमाने,फिरोज आतार, विशाल तेली, अमरसिंह खानविलकर, प्रोग्रेसीव्ह कॉन्व्हेंट स्कूल च्या संचालिका सौं संध्या गायकवाड, डॉ भारत पोंदकुले,डॉ. चंद्रकांत इनामके, श्रीकांत गायकवाड, सौं मृणालिनी भोसले, सौं.रश्मी रनवरे, रेवडेदादा,हॉटेल विसावाचे प्रभाकर पाटील, दीपक शिंदे, विशाल पवार यांच्यासह हजारो सेवेकरांनी शुभेच्छा दिल्या.

  दुपारी १ वाजता आरती झाली त्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त कोणीही हार, बुके न आणता गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी वह्या व शैक्षणिक साहित्य आणावे असे आवाहन त्यांच्या सेवेकरी भक्तांतर्फे करण्यात आले होते त्याप्रमाणे अनेकांनी भेट म्हणून वह्या पुस्तके शालेय साहित्य दिले.

 यावेळी रक्षक रयतेचा न्यूज तर्फे परमपूज्य काकांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या वाढदिवस विशेष अंकाचे प्रकाशन काकांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button