फलटण – भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण फलटण शहर प्रचाराच्या निमित्ताने पिंजून काढले असून प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.
फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे समशेरसिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी फलटण शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढला आहे नागरिकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन ते समस्या जाणून घेत आहेत त्याच पद्धतीने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील याबाबत सुद्धा नियोजन बैठका घेत आहेत सामान्य लोकांच्या सतत संपर्कात राहिल्याने प्रचारात ते जेथे जेथे जातात तेथे तेथे त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. प्रत्येक प्रभागात त्यांनी प्रचार फेऱ्यासुद्धा काढल्या आहेत. विविध ठिकाणच्या कोपरा सभांमध्ये ते भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून फलटण शहरात झालेली विकास कामे सांगत आहेत. तसेच शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढे काय काय करणार याबाबतची माहिती देत आहेत. दिवस-रात्र त्यांचा वैयक्तिक संपर्क सुरु आहे. सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन ते विविध ठिकाणी करत आहेत त्यांच्या प्रचार दौऱ्याला तरुण वर्गाकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.